Wednesday, 19 April 2017

चांदोबा चांदोबा ......

चांदोबा चांदोबा आता तु खरा भागणार ,
लिंबोणी चे झाड नाही तु कुठे लपणार ,
सिमेंट च हे जंगल लई बेबंदी ,
त्यात मामाचा वाडा नाही राहीला चिरेबंदी .

मामाचा वाडा जाऊन तिथे आला टॉवर ,
टु बी एच के फ्लॅट मिळाला विथ बॅकअप पावर ,
मामाच्या घरी एकदा येऊन जा ,
चायनीज ,पिझा नी बर्गर खाऊन जा ,
चायनीज मध्ये सापडली माशी ,
चांदोमामा तु आता राहणार उपाशी .

वाड्यात होती मजा ,तशी उरली आता नाही,
एकमेकांना साथ द्याया , वेळ नाही काही  ,
कोजागिरीत जागवलेल्या त्या अनेक रात्री ,
सख्ये नव्हते कोणी पण नात्यांना लागली आता कात्री ,
चार भिंतीच आता सगळयांचं जीवन झालंय,
टॉवरनी वाडयातल्यांना आता दुर दुर नेलंय .

चांदोबा चांदोबा कुठे रे गेलास
ते गेले दुर तसे तु नाही ना गेलास ,
हाकेला तु तरी माझ्या ओ देशील काय ,
आमच्या तलं अंतर कमी करशील काय ,
आमच्या तलं अंतर कमी करशील काय ...

कवी : प्रसाद वाचकवडे

No comments:

Post a Comment

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...