Saturday, 28 July 2018

नविन कवीता ..... नाव आपणच सुचवावे ....

राजे..... पुन्हा तुम्ही यावे....

 

राजे तुमच्या जयंतीला,
आता दोन दोन तारखा ,
कट्टर शिवभक्त तरी ,
हो तुमच्या प्रेमाला पारखा .

 

तुमचे कर्तृत्व आठवण्यासाठी ,
केलेत दिन हे खास ,
कश्यास हवेत विशेष दिन
तुम्हास आठवण्यास.
मान झुकून हात ही वळतो ,
मुजरा करण्यास सारखा .
राजे तुमच्या जयंतीला.........

 

तुमच्या लेखी स्वराज्य ,
होते सर्व धर्म समभाव ,
सच्चे होते सगळे ,
कुणास न्हवती कसली हाव ,
क्षणोक्षणी वार इतके होतात ,
कसा निभावेल अंगरखा.
राजे तुमच्या जयंतीला.........

 

आता तुमच्या जयंतीला ,
दिखावा उधान आले खुप ,
पोवाडे , ढोल ताशे कमी ,
कानी डिजे चे संगीत कुरुप ,
स्वराज्य राक्षिण्या राहीले,
कमी तानाजी अन् जीवा सखा .
राजे तुमच्या जयंतीला.........

 

तुम्ही मिळवले स्वराज्य ,
तेव्हा आई बहीनी होत्या बिनघोर ,
राज्याच्या राज्यी सज्जन सगळे ,
कोणीच नसतील चोर ,
आज एकटे फिरण्या त्यांसव ,
लागतो पाठीराखा .
राजे तुमच्या जयंतीला.........

 

यावे राजे तुम्ही पुन्ह्यादा , 
सत्वशील स्वराज्य निर्मण्या ,
मनातील कटुता ही मिटवुन ,
प्रेम दिप अहोरात पेटण्या ,
असे जाहले तर  स्वराज्यी होईल
प्रत्येक मावळा हा धर्मराखा .
अन् राजे तुमच्या जयंतीला तेव्हा नसतील दोन दोन तारखा......
अन् राजे तुमच्या जयंतीला तेव्हा नसतील दोन दोन तारखा......


                                                                                  कवी :- प्रसाद वाचकवडे 

No comments:

Post a Comment

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...