Wednesday, 12 April 2017

श्वास


श्वास,

डॉक्टर काका डॉक्टर काका ,एवढच मला सांग ,
तुझ्या पैशासाठी का तु घेतला माझा प्राण.
सोनोग्राफी होता, सुरुवात याची झाली,
बघुन तुम्ही रिपोर्ट सकळा खुषखबरी दिली,
चेहरे खुलले , आतातरी मुलगाच होणार ,
पैसे न कमवता तुम्ही तरी , कसे काय बोलणार ,
सांगीतल्यावर तुम्ही आईत , नाही उरले त्राण .
तुझ्या पैशासाठी का तु घेतला माझा प्राण.

घरी जाता बाबांच्या , वाटलं आनंद झाला असेल ,
पंचारतीचे ताट , काका पेढे वाटत हासेल ,
आई घरात शिरताच , तिला शिव्यांच्या लाखोल्या ,
उणे दुणे काढुन , तळतळाट आणि वाकुल्या ,
मुलगा नसेल तर पुन्हा मुलगी नको मला ,
काय करायचे कर , बाबा ,आजी म्हणती तिला ,
कळत होते मला पण , मला तेव्हढी होती जाण ,
तुझ्या पैशासाठी का तु घेतला माझा प्राण.

उद्याच होणार सोक्षमोक्ष , सगळे तोऱ्यात बोलले ,
बाबांचे आणि तुमचे व्यवहाराचे बोलणे झाले ,
त्या रात्री आई पण ढसा ढसा रडली ,
अबला पणावर तिच्या , ती मनसोक्त चिडली,
हात ठेवुन पोटावर , ती तशीच निजली ,
माझी काय चुकी यात सारी रात मी जागली ,
स्वप्नात पण बडबडत होती माझी तुम्हाला आण,
तुझ्या पैशासाठी का तु घेतला माझा प्राण.

एका दिवसाच्या जगण्यात मी खुप शिकले,
मुलासाठी बाबानी मला कसायाला विकले ,
गेलो हॉस्पीटलात , तयारी सगळी होती झाली ,
भितीने मी तेव्हा , पुरती भेदरूनच गेली .
बळजबरी आईला कसलं औषध पाजलं ,
क्षणार्धात माझे तेव्हा अंग हो जळलं ,
तोडलं आईपासुन तिच्या पोटी आहेत व्राण,
तुझ्या पैशासाठी का तु घेतला माझा प्राण.

जगायचं होतं मला , खुल्या आसमानात स्वछंद ,
माश्यासारखं डुंबायंच , पक्षासारखं जगणे बेधुंद ,
घ्यायचा होता मलाही मनसोक्त श्वास,
झाशीच्या रानीसारखा प्राबाल्यक ध्यास ,
व्हायचे होते आई जिजाऊ , जिने स्वराज्य निर्मिली ,
कित्येक होती स्वप्ने माझी तु बेचीराख केली ,
काय होती चुकी माझी , मला एकदाच तु सांग,
तुझ्या पैशासाठी का तु घेतला माझा प्राण.

Dedicated to all my beloved baby girls from all over the world who not take a single breath.............

                                                                                        कवि- प्रसाद वाचकवडे .

No comments:

Post a Comment

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...