Sunday, 16 April 2017

बालपण.


बालपण.

वाढताना वय निसटुन जाई हातातुन ,
साजिरे ते , गोजिरे ते माझं गोड बालपण.


तेव्हा प्रत्येक कृतीला ,मला मिळायचा खुप भाव ,
आणि चुकलो जरी , सुधारायला भरपुर वाव .
रोजचेच होते माझे , चांदोबा ,चांदण्याचे गाव ,
फक्त खाऊचीच होती ,नव्हती दुसरी कुठली मला हाव,
आता आठवताना वाटतं, किती जम्माडी ती होती पण,
साजिरे ते , गोजिरे ते माझं गोड बालपण.


उन्हाळी सुट्टी कशी घालवावी याची जय्यत तयारी,
कैरी तोडण्या,नदी डुंबण्यास निघायची स्वारी ,
मामी बनवायची रोज रोज नवी नवी न्याहारी,
तेव्हा मामाच्या गावाची मजाच खुब होती न्यारी,
आता आठवलं की वाटतं काहीतरी मागे राहीले पण ,
साजिरे ते , गोजिरे ते माझं गोड बालपण.


आता ह ह ह
आता चुकायचा नाही राहीला काहीच अधिकार,
शब्द चुकता खावे लागतात शब्दांचेच फटकार,
हल्ली चुकली जर कृती , प्रश्नांचे यथेच्छ भडीमार,
आवडणाऱ्या गोष्टी टाळतो, स्टेस्टस असतं समोर ,
देवा बास झालं प्रेशरआता,परतं थोडं देतो का तु पण,
साजिरे ते , गोजिरे ते माझं गोड बालपण.
 
 
                                                                                            कवी:- प्रसाद वाचकवडे
 

No comments:

Post a Comment

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...