प्रेम विवाह
मनात आलं माझ्या,
प्रेम विवाह पहावा करून,
करून कोणावर तरी ,
प्रेम घागर घ्यावी भरून .
लावली सेटींग लगोलग ,
चौकात बसायला लागलो ,
एकदम शायनर मुलासारखं,
मी पण रोज वागलो .
एक पोरगी बघायची,
माझ्याकडे वळुन वळुन ,
मी बघताच तिच्याकडे ,
जायची पुढे आडाण्यासारखं कळुन .
एकदा गाठलचं तिला ,
मारला प्रपोज , विचारलं ,
लाजुन ती ही म्हणाली , होय .
माझ्यात आता प्रेम भूत संचारलं .
सात आठ महिन्यातचं ,
पळुन जाऊन लग्न झालं ,
कारण तिच्या घरच्यांनी ,
माझ्या प्रेमाला नाकारलं .
म्हणतात ते खरचं लग्न,
म्हणजे नसते ते विघ्न,
आम्ही राजा राणी झालो ,
आपल्या संसारात मग्न .
वर्षातच झालं आमचं,
तंटायुध्द चालु ,
ती म्हणाली माझ्या बरोबर ,
नको तु बोलु .
साडीवरून लागलेली आग ,
एवढी पेटत गेली ,
समजावले तिला तरी ,
ती नाही समजली .
मग चालु झालं,
SMS चं सत्र ,
बोलणं कमी घरी ,
फक्त मोबाईल पत्र .
हसत म्हणाली एकदा,
आपण होऊ वेगळं ,
वाळु निसटावी हातातुन ,
तसं निसटलं सगळं .
मी पण किती वेळ,
संसार गाडा ओढणार ,
ती म्हणाली तसाच ,
मी ही डाव मोडणार .
असं सगळं असतं ,
म्हणुन प्रेम विवाह करू नये,
गोड असतोच ऊस ,
म्हणुन मुळासकट खाऊ नये .
कवि- प्रसाद वाचकवडे .
No comments:
Post a Comment