Friday, 23 September 2016

पाझर


पाझर

 

आदल्या राती त्याचं ,
मन व्हतं खिन्न ,
तुझ्या पायी मेघा माझं ,
जगणं झालं छिन्न .

वाजीवलं म्या खुप ,
जोरजोरानं दार ,
आवाज नसे पल्याडुनी ,
अंग घामानं जार जार .

खटपट करून जवा ,
कडी मी खोलली ,
क्षणभरात पायाखालची ,
धरणीच फाटली .

धनी माझा लटकला,
घेऊनीया फास ,
डोळयातुनी त्याच्या तरी,
संपली नायी आस .

सुटला जवा बांध,
तवा नदी आवरंना ,
बघुनी हे समदं तरी ,
तु का पाझरंना .

तुज्यापायी तवा माझं ,
कुकू हारावलं,
दिवा लावाया तवा,
घर थ्वाडं सारावलं .

सारवता जिमीन,
आल तुझचं चितार,
आला नाही तु जर,
व्हणार नाही हे पितार .

गेलं माझं कुकू ,
गेलं सौभाग्याचं लेणं ,
इतका बरस आता ,
नग कुणावरबी देणं .
नग कुणावरबी देणं .

                                                         कवी : - प्रसाद वाचकवडे

No comments:

Post a Comment

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...