Wednesday, 28 September 2016

दान


दान


देवा माझ्या झोळीमंदी,
दे ना थोड दान,
सुकले रे डोळे मांजे,
सुकलं नाही मन.

काल परवा तु आला,
पावणा बणुन ,
वली केली भुई थ्वडी,
उगवल बग तन .

गुरं मेली , ढोरं मेली ,
लोक इकती जिमीन,
मुद्दल राहतं तसं ,
जाई व्याजचं फिटुन .

विष पिऊन मरतो कोणी ,
कोणी फास लावुन ,
उरलं सुरलं बँक नेते ,
गळा आवळुन .

सरकारचे पॅकेज येते ,
गाजावाजा करून ,
आमच्या कडे येत नाही ,
बसतो आस लावुन.

व्यथा वाहे डोळयातुन ,
नदया ह्या बनुन ,
भर सकाळी घाम ,
मले आला दरदरून .

वाटलं तवा बळीराजाला ,
कसलं धान आणि धन ,
जिंदगी सरणात जाई ,
मेघाला आर्तुन ,
मेघाला आर्तुन .


 
                                                                             कवी :-- प्रसाद वाचकवडे

No comments:

Post a Comment

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...