धरणी
प्यायला बी पानी नायी ,
समदं रं संपलं ,
करापल्या धरणी पाई,
म्या नांगरां जुपलं .
प्यायला बी पानी नायी ,
समदं रं संपलं ,
करापल्या धरणी पाई,
म्या नांगरां जुपलं .
डोळ्यातल्या पाण्यानीबी,
तीजी तान ना भागली ,
अंगीच्या धामालाबी,
ती नाहीबा जागली.
पाणोड्याला आणुनबी ,
पाणीच लागंना,
बोर हिरी आटल्या ,
कुठं चाराबी दिसंना .
ऐकंक करून बगा ,
समदं गेलं निसटुन ,
हासतं व्हतो वरण,
तुटलो व्हतो आतुन .
जमीनीकं मला आता ,
पाहावत नाही ,
वाडा चिरेबंदी हा
कित्येक साल तसा राही .
चातका परमाणे डोळे ,
सताड ठिवुन,
वाट तुझी बगतो,
श्वास कंठी आणुन .
कधी जागणार तु ,
कधी धरणी बी न्हाणार ,
हिरवाईचं लुगडं ,
कवा पुणा ती ल्याणार .
कवा पुणा ती ल्याणार
No comments:
Post a Comment