Wednesday, 28 September 2016

आरक्षण


आरक्षण

ब्रम्ह राजे आले एकदा ,
पृथ्वीवर स्वर्गातुन ,
काय म्हणाले असते ,
म्हणतात ते आरक्षण .

मी म्हणालो तो क्षत्रीय ,
तो महार आण तो ब्राम्हण ,
तो मांग , तो मराठा ,
तो तेली आण तो लमान .

जो असेल श्रीमंत जरी ,
ज्याच्या घरी कायम चणचण ,
जो दोनवेळचा कायमच भुकेला ,
त्याची कागदामुळे होणारी वणवण .

जो ४५ टककयात येथे
साहेब होतो पण ,
अन ९० टककया वाला ,
बसतो हात चोळुन .

ज्याची एैपत असते त्याला ,
इथे फुकट शिक्षाण,
ज्याची नाही एैपत त्याची ,
सगळीच दाणादाण .

थोडक्यात देवा ,
तुम्ही बनवला जेव्हा माणुस ,
त्याला नव्हतचं कुठलं कोंदण ,
माणसाला माणसातुन उठवणारे ,
हेच ते आरक्षण , हेच ते आरक्षण .

                                                                           कवी :-- प्रसाद वाचकवडे

दान


दान


देवा माझ्या झोळीमंदी,
दे ना थोड दान,
सुकले रे डोळे मांजे,
सुकलं नाही मन.

काल परवा तु आला,
पावणा बणुन ,
वली केली भुई थ्वडी,
उगवल बग तन .

गुरं मेली , ढोरं मेली ,
लोक इकती जिमीन,
मुद्दल राहतं तसं ,
जाई व्याजचं फिटुन .

विष पिऊन मरतो कोणी ,
कोणी फास लावुन ,
उरलं सुरलं बँक नेते ,
गळा आवळुन .

सरकारचे पॅकेज येते ,
गाजावाजा करून ,
आमच्या कडे येत नाही ,
बसतो आस लावुन.

व्यथा वाहे डोळयातुन ,
नदया ह्या बनुन ,
भर सकाळी घाम ,
मले आला दरदरून .

वाटलं तवा बळीराजाला ,
कसलं धान आणि धन ,
जिंदगी सरणात जाई ,
मेघाला आर्तुन ,
मेघाला आर्तुन .


 
                                                                             कवी :-- प्रसाद वाचकवडे

धरणी


धरणी

प्यायला बी पानी नायी ,
समदं रं संपलं ,
करापल्या धरणी पाई,
म्या नांगरां जुपलं .


डोळ्यातल्या पाण्यानीबी,
तीजी तान ना भागली ,
अंगीच्या धामालाबी,
ती नाहीबा जागली.


पाणोड्याला आणुनबी ,
पाणीच लागंना,
बोर हिरी आटल्या ,
कुठं चाराबी दिसंना .


ऐकंक करून बगा ,
समदं गेलं निसटुन ,
हासतं व्हतो वरण,
तुटलो व्हतो आतुन .


जमीनीकं मला आता ,
पाहावत नाही ,
वाडा चिरेबंदी हा
कित्येक साल तसा राही .


चातका परमाणे डोळे ,
सताड ठिवुन,
वाट तुझी बगतो,
श्वास कंठी आणुन .


कधी जागणार तु ,
कधी धरणी बी न्हाणार ,
हिरवाईचं लुगडं ,
कवा पुणा ती ल्याणार .
कवा पुणा ती ल्याणार

                                                                               कवी :-- प्रसाद वाचकवडे

Friday, 23 September 2016

पाझर


पाझर

 

आदल्या राती त्याचं ,
मन व्हतं खिन्न ,
तुझ्या पायी मेघा माझं ,
जगणं झालं छिन्न .

वाजीवलं म्या खुप ,
जोरजोरानं दार ,
आवाज नसे पल्याडुनी ,
अंग घामानं जार जार .

खटपट करून जवा ,
कडी मी खोलली ,
क्षणभरात पायाखालची ,
धरणीच फाटली .

धनी माझा लटकला,
घेऊनीया फास ,
डोळयातुनी त्याच्या तरी,
संपली नायी आस .

सुटला जवा बांध,
तवा नदी आवरंना ,
बघुनी हे समदं तरी ,
तु का पाझरंना .

तुज्यापायी तवा माझं ,
कुकू हारावलं,
दिवा लावाया तवा,
घर थ्वाडं सारावलं .

सारवता जिमीन,
आल तुझचं चितार,
आला नाही तु जर,
व्हणार नाही हे पितार .

गेलं माझं कुकू ,
गेलं सौभाग्याचं लेणं ,
इतका बरस आता ,
नग कुणावरबी देणं .
नग कुणावरबी देणं .

                                                         कवी : - प्रसाद वाचकवडे

Monday, 19 September 2016

का वाटते सांग तुला……..


का वाटते सांग तुला……..

का वाटते सांग तुला जाईल मी दुर ,
का असतात मनी तुझ्या वादळांचे पुर.
जेव्हा पासुन कळलय तुला ,
मला आला तिचा फोन ,
चिंतेतच असते तेव्हापासुन,
प्रत्येक क्षणोण क्षण ,
पावलोपावली जाणवे मज तुझी हुरहुर,
का वाटते ...

लग्ना आधीच तुला ,
तेव्हा सांगीतलं खरं ,
तु म्हणाली जुने सगळे ,
जाऊ दया ना बरं,
संसार करू या आता भविष्य ठेवुन समोर ,
का वाटते ...

ती होती भुतकाळ ,
जरी नव्याने भेटली ,
तिचा संसार आहेच की ,
तिच्या सुखाची पोटली ,
मित्र अहोत सच्चे नाही मनी चोर .
का वाटते .....

तुच आहेस आयुष्य माझे ,
तुच माझी धकधक ,
श्वास आहेस माझा अन,
एनर्जी तुझी बकबक,
प्रेमानेच तुझ्या दिला जगण्याचा जोर ,
कसा जावु सांग तुझ्यापासुन मी दुर,
कसा जावु सांग तुझ्यापासुन मी दुर .


कवी:- प्रसाद वाचकवडे

Friday, 2 September 2016

पाऊलवाट


पाऊलवाट

 

प्रेम माझे तुझ्यावर,
आहे ऐवढे खास,
मोगऱ्याचा गंध जसा,
दरवळे हमखास .

रोखुनीया मार तु,
तुझ्या नजरेचे बाण,
आवडेल मला जरी
गेला माझा प्राण.

दुरदुर शोधतो तुला,
तु नसशी समीप,
मनाच्या त्या कोपऱ्यात,
तुच तु अमाप.

या जन्मी शक्य नाही,
जरी दोघांचे मिलन,
भिन्न दोन ध्रुव,
कसे येणार जुळून.

म्हणुन पुन्हा फिरलेत डोळे ,
तुझी पाहुनी या वाट,
दिसते जरी सोपी तरी ,
अवघड ही पाऊलवाट .


 

 

कवी :-प्रसाद वाचकवडे

 

भास.



भास.


हवा हवा वाटतो का तुझा सहवास,
सांग माझ्या डोळ्यांना मग का होतात भास .


शोधते दुर दुर नजर, तु दिसत नाही ,
असलीस ऑनलाईन तरी मेसेज येत नाही ,
वायब्रेट झाला फोन , तो तु केल्याचा आभास .
सांग माझ्या ..................


पाच पाच मिनीटांनी फोन घेऊन हाती ,
चेक करतो त्याची सगळी व्यवस्थित स्थिती,
येत नाही कॉल , येईल ही वेडी आस,
सांग माझ्या...................


येत नाही कॉल तुझा , आठवण खुप येते ,
क्षणभर का होईना मला बाहुपाशी घेते,
म्हणते माझ्या राजा , मी इथेच आहे पास,
सांग माझ्या...................



                             कवी :-प्रसाद वाचकवडे

 

 

 

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...