Wednesday, 2 August 2017

प्रेम दंड.....


प्रेम दंड

 

चाललो गर्दीत तरीही,

मी अजुनी ऐकलाच आहे .

जाहले अगणित स्पर्श,

मी तरी पारखाच आहे .

 

थांबलो या आडवाटी,

ओढ अंतरी मलाच आहे,

चाहतो जरी नित्य तुजला ,

तु तशी बलाच आहे .

 

शोधील्या मी खुप साऱ्या,

गंध तो तुलाच आहे .

जाणुनी अजाण होणे ,

ही तुझी कलाच आहे .

 

का न यावे ओठी मनीचे,

ही तशी खलाच आहे ,

प्राक्तनाने राहीलेच दुर,

हा प्रेम दंड मलाच आहे .

 

                               कवि-: प्रसाद वाचकवडे

 

No comments:

Post a Comment

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...