मी पुन्हा त्या चांदण्यांचा........
मी पुन्हा त्या चांदण्यांचा जाहलो नाही ,
हरवलो तुझ्यात माझा राहीलो नाही .
बैसलो चांदणे शिंपीत रातीचा मी जरी ,
भेट आपली अधोरेखीत होतसे तेव्हा परी ,
मग आठवांचे शब्दकोडे सोडवावे या उरी ,
विसरूनी मग दुनिया सारी भेटुया नदीतीरी ,
चाललो तुजसवे इतका, पुन्हा चाललो नाही ,
मी पुन्हा त्या चांदण्यांचा जाहलो नाही ,
हरवलो तुझ्यात माझा राहीलो नाही .......
मिटुनी घट्ट लोचने , सौंदर्य तुझेच पाहतो ,
मोगऱ्याचा गंध ही तुज समोर फिका वाटतो ,
नसले काजळ जरी, नयन कटाक्ष शोभतो ,
सामावण्या मिठीत तुझीया मीही मग सरसावतो ,
साठविता रूप नयनी साठले नाही ,
मी पुन्हा त्या चांदण्यांचा जाहलो नाही ,
हरवलो तुझ्यात माझा राहीलो नाही .......
वाट तुझीच पाहुनी , अश्रु नव्हते निजले,
तेच झाड अन तोच कट्टा , काही नव्हते थिजले,
दिसा मागुन रात , कित्येक महीने होते सरले ,
बंध आपुल्यातले होते , सये का विरले ,
चाललो इतका पुढे , मागे पाहीले नाही ,
मी पुन्हा त्या चांदण्यांचा जाहलो नाही ,
हरवलो तुझ्यात माझा राहीलो नाही .......
कवि-: प्रसाद वाचकवडे .
No comments:
Post a Comment