प्रेम
दंड
चाललो
गर्दीत तरीही,
मी
अजुनी ऐकलाच आहे .
जाहले
अगणित स्पर्श,
मी
तरी पारखाच आहे .
थांबलो
या आडवाटी,
ओढ
अंतरी मलाच आहे,
चाहतो
जरी नित्य तुजला ,
तु
तशी बलाच आहे .
शोधील्या
मी खुप साऱ्या,
गंध
तो तुलाच आहे .
जाणुनी
अजाण होणे ,
ही
तुझी कलाच आहे .
का
न यावे ओठी मनीचे,
ही
तशी खलाच आहे ,
प्राक्तनाने
राहीलेच दुर,
हा
प्रेम दंड मलाच आहे .
कवि-: प्रसाद वाचकवडे