चांद्र मोहीम
चांदोबा चांदोबा ,
तुला माहीत आहे काय ,
पृथ्वीवरच्या मानवांना ,
ठेवायचेत तुझ्यावर पाय .
तयारी चाललीये यंत्रे नविन बनवुन,
ती तुझ्यावर पुरण्याची,
येत्या काही वर्षात ,
तुझ्यावर हनीमुन करण्याची .
तु बाबा , जरा जपुणच राहा ,
अजुनही तुच आहेस भुषण,
मात्र काही वर्षात येणार हे ,
तुझ्यावर पृथ्वीच प्रदुषण .
मग तोच होणार आटापिटा,
चंद्र वाचवा मोहीम ,
मग पुन्हा नव्या ग्रहाचा शोध ,
अशीच चालणार ग्रहशोध मोहीम .
कवी -: प्रसाद वाचकवडे