शेवट......
मी आताशा या घडीला ,
पाप पुण्ये मोजतो आहे.
गेल्या जरी त्या हातातुन निसटुन,
लावतो संदर्भ आहे.
झाकले डोळे जरी मी ,
मी तसा जागाच आहे .
शोधतो शब्द रिक्त जागी,
ज्या जागा कोऱ्याच आहे.
भ्रांत मज नाही कशाची ,
इच्छा माझ्या शुन्य आहे .
करूणा विवश भाव नको मज,
साठवले ते पुण्य आहे .
सोडुनी बाहुपाश सारे ,
जीव मी सोडला आहे.
व्यर्थ सांडु नकात अश्रू ,
संसार मीच मोडला आहे.
कोणासाठी मी एवढाही जगलो,
हे मलाही कोडेच आहे ,
जीव द्यावा ज्यांच्या ही साठी ,
निस्वार्थी जगी थोडेच आहे .
कवी : प्रसाद वाचकवडे .