Tuesday, 27 November 2018

कट्यार........


खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला......

कट्यार........

भारलेली ती सकाळ ,
दवबिंदु शिंपीत होती ,
लाजुनी हसणे तुझे ते ,
त्यावरी कोटीच होती.

जाहलो मग मी समोर ,
मोह झाला स्पर्शण्याचा,
भिडली ही नजरेस नजर,
अन् कट्यार ती आरपार होती.

व्हावे मी जखमी कितींदा ,
जाहली ही आता सवय,
अडखळतो पुन्हा त्याच वळणी ,
जी तुझी पायवाट होती.

केला मी निर्धार पक्का ,
तोडुनी टाकावेत बांध ,
भावना गुंफावी शब्दात ,
जी अंतरी खोलात होती .

आला तो दिस अखेर सोन्याचा ,
तु माझ्या समोर होती ,
भावना एकवटल्या ओठी ,
अन् तीथेच दुःखाची नांदी होती .

नजर जाता अनामिकेवर ,
चमकली ती अंगठीच होती ,
तुटल्या भावना क्षणार्धात ,
ती माझी काळरात्र होती.

                                    कवि- :प्रसाद वाचकवडे

Saturday, 28 July 2018

नविन कवीता ..... नाव आपणच सुचवावे ....

राजे..... पुन्हा तुम्ही यावे....

 

राजे तुमच्या जयंतीला,
आता दोन दोन तारखा ,
कट्टर शिवभक्त तरी ,
हो तुमच्या प्रेमाला पारखा .

 

तुमचे कर्तृत्व आठवण्यासाठी ,
केलेत दिन हे खास ,
कश्यास हवेत विशेष दिन
तुम्हास आठवण्यास.
मान झुकून हात ही वळतो ,
मुजरा करण्यास सारखा .
राजे तुमच्या जयंतीला.........

 

तुमच्या लेखी स्वराज्य ,
होते सर्व धर्म समभाव ,
सच्चे होते सगळे ,
कुणास न्हवती कसली हाव ,
क्षणोक्षणी वार इतके होतात ,
कसा निभावेल अंगरखा.
राजे तुमच्या जयंतीला.........

 

आता तुमच्या जयंतीला ,
दिखावा उधान आले खुप ,
पोवाडे , ढोल ताशे कमी ,
कानी डिजे चे संगीत कुरुप ,
स्वराज्य राक्षिण्या राहीले,
कमी तानाजी अन् जीवा सखा .
राजे तुमच्या जयंतीला.........

 

तुम्ही मिळवले स्वराज्य ,
तेव्हा आई बहीनी होत्या बिनघोर ,
राज्याच्या राज्यी सज्जन सगळे ,
कोणीच नसतील चोर ,
आज एकटे फिरण्या त्यांसव ,
लागतो पाठीराखा .
राजे तुमच्या जयंतीला.........

 

यावे राजे तुम्ही पुन्ह्यादा , 
सत्वशील स्वराज्य निर्मण्या ,
मनातील कटुता ही मिटवुन ,
प्रेम दिप अहोरात पेटण्या ,
असे जाहले तर  स्वराज्यी होईल
प्रत्येक मावळा हा धर्मराखा .
अन् राजे तुमच्या जयंतीला तेव्हा नसतील दोन दोन तारखा......
अन् राजे तुमच्या जयंतीला तेव्हा नसतील दोन दोन तारखा......


                                                                                  कवी :- प्रसाद वाचकवडे 

Wednesday, 21 February 2018

तु.......

नवी कविता ... तु

तु चाह माझी आहे , 
हे तु चांगलेच जाणते ,
व्यक्त होतो मी नयनांतुन ,
तु शब्द का ताणते .

मी शब्दाला पोरका ,
तु विश्वकोश सारा ,
नजरेच्या बोलीपेक्षा ,
तु शब्द प्रभावी मानते .

मज हेवा हे त्याचा ,
तुझ्या भाळी जो वसतो ,
त्या चंद्रकोरीलाही ,
तु तुझ्या सौंदर्यात विणते .

तु आल्यावर सामोरी ,
आणी काय होणार गहजब ,
बंद होणार होती ती,
पणतीही मिणमिणते.

हा खटाटोप सारा तुला,
प्रेम सांगण्यासाठीचा,
मी अबोलच होतो ,
प्रयत्न माझेही क्षिण ते.

कधी होणार गंधीत,
रंगीत ,आयुष्य माझे ,
सहवास हवा तुझा अण,
तु बाय बाय म्हणते .


                           कवी -: प्रसाद वाचकवडे .

Wednesday, 17 January 2018

शेवट......


शेवट......

 

मी आताशा या घडीला ,

पाप पुण्ये मोजतो आहे.

गेल्या जरी त्या हातातुन निसटुन,

लावतो संदर्भ आहे.

 

झाकले डोळे जरी मी ,

मी तसा जागाच आहे .

शोधतो शब्द रिक्त जागी,

ज्या जागा कोऱ्याच आहे.

 

भ्रांत मज नाही कशाची ,

इच्छा माझ्या शुन्य आहे .

करूणा विवश भाव नको मज,

साठवले ते पुण्य आहे . 

 

सोडुनी बाहुपाश सारे ,

जीव मी सोडला आहे.

व्यर्थ सांडु नकात अश्रू ,

संसार मीच मोडला आहे.

 

कोणासाठी मी एवढाही जगलो,

हे मलाही कोडेच आहे ,

जीव द्यावा ज्यांच्या ही साठी ,

निस्वार्थी जगी थोडेच आहे .

 

                                                                                      कवी : प्रसाद वाचकवडे .

 

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...