Sunday, 11 June 2017

रात्रीचा राजा…..


रात्रीचा राजा…..

 

उठल्यावरती आजुबाजु ,

माझ्या कोणी नाही,

आई बाबा कामाला ,

आजी माझ्या सवे राही .

 

किर्रर्र शांतता असे,

घरी उजेड ही असताना ,

भिम काली या दोस्त माझे ,

घरी घरचे नसताना.

 

त्यांचा सवे शेअर करतो ,

गुपीते मी माझी ,

दुखले खुपले सांगतो त्यांस,

ते नसतात खुप बिझी .

 

दिस जातो सरत सरत,

वाट पाहतो रात्रीची,

घालवाया मन कल्लोळ,

आई बाबांच्या मिठीची.

 

आल्यावर घरी दोघे ,

जरी दमलेले असतील,

हात लांब करून ,

मला कवेमध्ये घेतील.

 

सांगताच मग गोष्टी ,

दिनभराच्या आईला ,

समरस एवढी होई ती ,

भान न राही त्या बाईला.

 

झोपताना मिठीत दोघांच्या,

मग स्वतःला अडकवतो ,

सकाळचा पोरका मी,

रात्रीचा मात्र राजा होतो .

 

                                                               कवि:- प्रसाद वाचकवडे .

 

To my beloved son and daughter we are sorry as we couldn't give you,your valuable reqd time.

 

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...