ती सध्या काय करते ....
आज DD LJ बघताना आपसुकच आली आठवण,
क्षणार्धात सरले डोळ्यापुढुन , कित्येक वर्षे , महीने अन क्षण .
नकळता माझ्या मनी विचार हा आला ,
ती सध्या काय करते, समजेल का मला.
डोकावताना मागे परत त्याच गेलो नाक्यावर,
परत मन बसलं जाऊन त्याच काळ्या बाकावर,
जिथुन तुझी माझी तेव्हा नजर भेट झाली,
तुझ्या कटाक्षाने गाली लाली पसरली,
नयनांनी तुझ्या माझा असा घात केला,
कटाक्ष तो तुझा मनी खोल आत गेला,
तेच क्षण आठवुन अंगी शहाराच आला,
म्हणुन ती सध्या काय करते , समजेल का मला.
नाक्यावरचे प्रेम नंतर फुलतचं गेलं,
जाता येता चौकामध्ये ते घुटमळू लागलं,
थकत नव्हते डोळे , तुझी वाट पाहुन आता,
तोंड नव्हतं दुखत तुझे गुण पुरे गाता,
येताना तु भासे जसा मंद वारा आला,
सुगंध हो तुझा , स्फुरण चढे या देहाला,
गंध पुन्हा तोच अनुभवायचाय मला,
म्हणुन ती सध्या काय करते , समजेल का मला.
सरणारे क्षण संपले , आता वास्तव आहे समोर ,
जमले नाही सांगाया , तसेच आहे ते लेटर ,
जपुन ठेवलय अजुन, जुनं स्वेटर ते घेतलेलं,
इप्रेस करायला तुला , जीवावर काय काय बेतलेलं,
पहीले प्रेम कायमच , असतं मनी कोरलेलं ,
पण कोरी करुन पाटी , जग पुढे चाललेलं,
मी ही पुढे आनंदात गेलोय, तुला तेच सांगायला,
तुझ्याही आनंदात निसंकोच , सामिल व्हायलां,
म्हणुन ती सध्या काय करते , समजेल का मला.
कवी - प्रसाद वाचकवडे .