अर्धांगिनी
काळ्या किर्र राती मधी , शोधताना स्नेहबंध ,
हात हाती दिला स्वतःहुनी ,
हात हाती दिला स्वतःहुनी ,
वाटे जेव्हा संपलेले आहे आता सर्व काही,
तुच असे सावली बनोनी .
सुखासाठी चुंबनाचा वर्षाव असला जरी ,
दुःखात खांदा हा सरकवोनी ,
माझी कित्येक छोटी छोटी स्वप्ने जगतात ,
तुझ्या या दोन लोचनी ,
तुझ्या मात्र स्वप्नांची अंतः यात्रा सर्व काळ ,
पचवतेस सदा तु स्मितुनी ,
देण्यासाठी नसेल ही , सोने चांदी नाणे ,
पर बहुमोल बाहुपाश देऊनी ,
गंध नसे चंदनाचा दिला जरी तुला ,
तु मोगरा ही घेते आनंदोनी ,
तुच तु भारलेली ओतप्रोत माझीया दिनराती '
कसा कृतकृत होऊ एका क्षणी . .
Happy valentine day.
कवी :- प्रसाद वाचकवडे