Wednesday, 16 November 2016

तु ..... एक गझल


तु ..... एक गझल

 

चांद राहतो डोळ्यात तुझिया,

अन म्हणे बिचाऱ्यास गाव नाही.

चांदण्यांची असते इथे उठबस,

अन म्हणे त्यांनाच भाव नाही.

 

स्पर्शुनी च होते तुजला सकाळ,

अन म्हणे किरणांनाच वाव नाही.

डोळे मिटते तु जेव्हा येतो तो रात्री,

अन म्हणे काळोखास आव नाही.

 

पुकारता तुझला मन होई सैरभर ,

अन म्हणे सौदंर्यास नाव नाही.

जगतो रोजच मी असा जरी पण ,

 तुज्या मिठी जगण्यात जगाचा ठाव नाही.

 


                                                                           कवी :-- प्रसाद वाचकवडे

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...