Monday, 29 August 2016

साथ


साथ
 
मन माझे झालेय चंद्र वेडे
नभात चांदन्यानी शिंपड़ले सड़े
पकड़ाया गेलो तरी निसटतो हाथ
मृगजळा समान मज वाटे तुझी साथ.
 
असली जवळ वा आसो दुर
होत नाही कधिच शब्दांचा पुर
मी पण जाणतो तुझे हालात
मृगजळा समान मज वाटे तुझी साथ.
 
मनी आसावांचा महापुर दाटे
तरी ओठी हासु तुझे कसे दाटे
आंतरीच्या जखमांची खुली कर वाट
मृगजळा समान मज वाटे तुझी साथ.
 
कधी हात घेऊनीया हाती
आठवनीत जागलेल्या अनेक राती
आयुश्यात कायम आहे रिमझिम बरसात.
मृगजळा समान मज वाटे तुझी साथ.
 
माझ्यात आनी तुझ्यात असेल जारी अंतर
दुधाळलेल्या चंद्राचे आहे मध्यांतर
बघताना नभी दाटतील अश्रु चे पाट
मृगजळा समान मज वाटे तुझी साथ.
 
 
 
कवि - प्रसाद वाचकवडे

बरसला पाऊस बरसला


बरसला पाऊस बरसला

बरसला पाऊस बरसला

झाली हिरवाई चोहिकडे

वाहतात नदी नाले

मळभ झाले दूर सारे

चैतन्य मनी आले

चेतक ही सुखावला  ......... बरसला पाऊस बरसला.

 

मोर गाई एक गाणे

पक्ष्यांचे उत्तुंग विहरणे

एकांती तुज़सवे फिरणे

स्पर्श होता तुझे शहारणे

शब्द नाही भावनेला .......... बरसला पाऊस बरसला.

 

साक्ष द्याया प्रेमाची

कधी आसमंत तुझ्यासाठी

भावनेच्या तुषारांनी

ओलावल्या रेशीमगाठी

मेघ ही गरजला ........... बरसला पाऊस बरसला.

 

तुझा हात घेऊन हाती

डोळेही भाषा बोलती

साठवण या क्षणांची

मनी माझ्या कायम राहती

अश्रुही नकळत ओघळला .............. बरसला पाऊस बरसला. 

 

 

 

                                        कवी - प्रसाद वाचकवडे.   

प्रवास


प्रवास

 

निघताना घरातुन तु                                                      

तुझे डोळे पाणवतात

लपवले तू जरी ते

इतरांना जाणवतात.

 

गाडी वर बसल्यावर

तुझा घट्ट होतो बंध

त्याक्षणी दरवळे फक्त

श्‍वासाचाच सुगंध.

 

बोलत नाही तु

चीडीचुप बसतेस

" तुम्ही शांत का ?"

असे मलाच विचारतेस.

 

कळतात मला पण

तुझ्या अंतरीच्या जखमा खोल

मी मात्र ढळून नाही देत

माझ्यामनावरचा तोल.

 

असच असताना मग

अचानक स्टेशन येते

क्षणिक माझ्यामनी ते

काहूर माजवते.

 

गाडी असते फलाटावर

पण तुला बसण नाही होत

काळजावरच्या ओझ्याने

भरल मन ओत-प्रोत.

 

बसल्यावर खिडकी पाशी

काळजी घ्या म्हणतेस

हसलो तुझ्यासमोर तरी

मनीच्या वेदना तु जाणतेस.

 

गाडी निघताना तु

सहजच हळवी होते

नयनीच्या रेशीमधारा

मनोमिलन आपले घडविते.

 

तु होतेस हळुहळू दुर

नजरेपासुन लांब जाते

तु अदृश्य झाल्यावर पाऊल

परतिच्या प्रवासा निघते.

परतिच्या प्रवासा निघते.

 

कवी:- प्रसाद वाचकवडे

नजर


नजर

 

बघुनच त्यांनी मला घायाळ च केल

रात्र भर तळमळुन बेजारच केल

झोप नाही मला रात्री झाल जागरण

अस तुझ्या नजरेने काय मला झाल.

 

डोळे मिटले तरी ते नाही विसरले

नजरेचे बाण माझ्या हृदयात शिरले

कुशी वर कूस झाला नाही उपयोग

अस तुझ्या नजरेने काय मला झाल.

 

उद्या हे करावे याचा झाला परीपाठ

तरी तुझ्या नजरेने सोडली नाही पाठ

सगळ्यात उजेडली यालाच पहाट

अस तुझ्या नजरेने काय मला झाल.

 

दिसलीस तू सकाळी बरोबर होते कोणी

विचारता मित्रास सांगे हा तर हिचा प्रेमी

तुटले हृदय , सारी रात्र मी स्मरली

तरी तुझी ती नजर नाही विसरली.

तरी तुझी ती नजर नाही विसरली.

 

 

कवी- प्रसाद वाचकवडे

 

तु माझ्यासाठी


 

एकदा त्याने तिला विचारले तुला माहितेय का तू माझ्यासाठी काय आहेस ................

 
तु माझ्यासाठी
थंडीमधली सूर्याची ऊब
आकाशातल्या चांदण्यांचे गाव
गरमीतला थंडगार वारा
भरतीतली कोळ्याची नाव
लहानग्याच बालपण
वर्षानुवर्षाची सुंदर साठवण
लग्न झालेल्या मुलीची
सासरी पाठवण.
निसर्गाची साद
वसंताची हाक
शाळेतल्या वर्गातला
शेवटचा बाक.
तो म्हणाला थोडक्यात सांगण कठीण तरीपण सांगतो ,
तुझ्याशिवाय जगण नाही
तूच माझ्या जगण्यातले मर्म
तू माझ्यासाठी आहेस
जगण्यासाठी लागणारे नित्यकर्म.

                                                                                         कवी:- प्रसाद वाचकवडे

 

 

डोळ्यातले मेघ............


डोळ्यातले मेघ............

आज पुन्हा जाणवी तो

तुझा कंठ दाटलेला

पावसाळा नाही तरी पण

मेघ का हो फाटलेला.

 

नीर नयनातुन वाहती

ओठ ही न बोललेला

ना नदिही नाही नाला

तरी पण महापूर आला.

 

क्षीण होऊन बघता नभीही

आठवणींचा ऊजाला

मी नसे तिथे तरीही

खांदा माझाच ओला.

 

वाटणारा गार वारा

 बोचते आता आम्हाला

त्रास होतो शांततेचा

आणि त्यावर तुझा अबोला.

 

वाटे द्यावा हात हाती

तोडावा तुझा अबोला

नजरा नजर भिडवावी

मिठीत घ्यावे या फुलाला.

 

लवकरात लवकर व्हावी

पुर्ण मनीची स्वप्न माला

पावसाळा नाही तरी पण

मेघ का हो फाटलेला.

                                                           कवी:- प्रसाद वाचकवडे

क्षण


क्षण

कसे विसरू सये सांग

तुझ्या संगतीतील हे क्षण

कधी गालातल्या गालात

हसणार्‍या तुझ्या डोळ्यात

घेऊन रात अशी हातात

 तुला सांगायचे होते पण......... कसे विसरू सये सांग.

 

कधी फिरताना रानात

एकटक तुला पाहण्यात

नदी काठी उभे राहण्यात

 तुला सांगायचे होते पण......... कसे विसरू सये सांग.

 

शब्दाना मुके करत

धुंद डोळे तुझे आठवत

मनोमनी तुजसाठी झुरत

तुला सांगायचे होते पण......... कसे विसरू सये सांग.

 

मांडी वर डोक ठेवता

स्वप्नांच्य़ा पलीकडे नेता

अश्रु तळहाती साठवता

तुला सांगायचे होते पण......... कसे विसरू सये सांग.

 

जरी असशील तू दुर

मनात माजलेल काहूर

तरी जुळलेले हे सुर , सांगतात मला

विसरणार नाही तू पण ..... माझ्या संगतीतील क्षण.

 

 

कवी - प्रसाद वाचकवडे.  

पाऊस


 
 
कधी कोसळणार्‍या पावसाला
हाती घेऊन बघ

बोचनार्‍या वार्‍याची कधी
साथी होऊन बघ.

चिंब होते वर्षावात
प्रेमाच्या तू जरी

कधी तळहाती थेंब टपोरे
साठवून तर बघ.

वाट निघाली तिकडे
जाता जाता मात्र

निसर्गात आडोश्याला
कधी थांबून तर बघ.

रोज बडबड तुझी
मोठ्या शब्दांची मात्र

कधी डोळ्यांचीही भाषा
बोलून तर बघ.

नेहमी गातेस तू जरी
प्रेमगीतांचे तराने

कधी विरह गीते पण
गावुन तर बघ.

नेहमी रडतेस तू
डोळे पाणावुन जरी

ओठी हासू ठेवुन कधी
रडून तर बघ.
 
                                                    कवी:- प्रसाद वाचकवडे

अपराधी मी आहे का???


अपराधी मी आहे का???

 

तुला सतत वाटते मी इतरांचा आहे,

मला मात्र तूच सर्वत्र दिसतेस ,

मग सांग अपराधी मी आहे का ?

 

जिथवर जाईल तिथवर नजर तुलाच शोधते,

तुला मात्र मी तुला पाहत नाही अशी खंत असते,

मग सांग अपराधी मी आहे का ?

 

हिरवाईने नटलेल्या निसर्गाच्या सानिध्यात भिजायला मलाही आवडते,

पण तू भिजल्यावर तुला सर्दी होईल या भीतीने मी ते टाळतो,

पण तुला मात्र मी स्वछदी वाटत नाही,

मग सांग अपराधी मी आहे का ?

 

गाडीवर बसताना तू अगदी बिलगुनच बसतेस,

मी मात्र तुला कोणीतरी पाहिलं या भीतीने तुझा हात बाजूला घेतो,

मग सांग अपराधी मी आहे का ?

 

नजरेला नजर भिडवून तासंतास तसेच बसावे असे मला पण वाटते,

पण प्रेमात पाय घसरू नये म्हणुन मी नजर फिरवली तर तुला मी बुजरा वाटतो,

मग सांग अपराधी मी आहे का ?

मग सांग अपराधी मी आहे का ?

 

 

कवी.... प्रसाद वाचकवडे

मेघ आले , मेघ आले


मेघ आले , मेघ आले, मेघ आले, हो..ओ..ओ..ओ..

दाटुनी आले आभाळ,

संपणार हा दुष्काळ,

बळीराजाचे सुप्त डोळे,

पावसाने केले ओले,

बरसल्या तनुवर माझ्या ,

सारी मदमस्त श्रावणाच्या,

अंकुरला बीज मातीतून,

हिरवे गालिचे अंथरले,

मेघ आले , मेघ आले, मेघ आले, हो..ओ..ओ..ओ..

 

वारा वाजवी जलतरंग ,

इंद्रधनुही पसरवी रंग,

ऐकताना हे मधुसंगीत ,

कोकिळेचे सुमधुर गीत,

चुकवूनी सर्वांच्या नजरा,

मोर फुलवी हळूच पिसारा,

कोसळणा-या धबधब्यातून ,

ओसंडून वाही नदी नाले,

मेघ आले , मेघ आले, मेघ आले, हो..ओ..ओ..ओ..

 

झेलाव्या ह्या टप टप गारा,

बोचणारा गांडीत वारा,

श्रावणाला सादही द्याया,

डोळे वृक्ष कोमल काया,

पाय वाटेवर चालत राहू ,

शिळ मनसोक्त वाजवू,

झुगारुनिया बंध जगाचे,

वर्षाप्रेम मनी साठवले,

मेघ आले , मेघ आले, मेघ आले, हो..ओ..ओ..ओ..

 

वाफाळलेल्या चहा सोबती , कांदाभज्याची अतूट प्रीती,

तळल्याचा तो मस्तच वास, यासवे दुसरा बेत नसेही खास,

जिभेवरून पाणी आपसूक येते, मन हे बघताच तृप्त होते,

क्षणाचा विलंब न करता , जिभेचे पुरवावे चोचले,

मेघ आले , मेघ आले, मेघ आले, हो..ओ..ओ..ओ..

 

कवी.... प्रसाद वाचकवडे

तुझ्या मनासारख मी तर तुला काहीच दिले नाही.....


तुझ्या मनासारख मी तर तुला काहीच दिले नाही.....

 

आजपर्यंत सुखावह असे तुला मी काहीच दिले नाही,

तरी सुद्धा तुझ्या ओठावरचे हासु ओसंडून वाही.

 

दिले चिमुटभर कुंकू ज्याने कपाळावर ओझे केल,

गळ्यातले चार मनी ज्याने शब्द तुझे दाबले,

सगळ्या अपेक्षांचे ओझे तुझ्यावर वाढतच जायी,

आजपर्यंत सुखावह असे तुला मी काहीच दिले नाही,

तरी सुद्धा तुझ्या ओठावरचे हासु ओसंडून वाही.

 

तुझा कधीहि नसतो अट्टाहास मनासारख तुझ्या काहीच घडत नाही,

छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी देव हि आपला अंत पाही,

मलाही द्यायचे असते सुख तुला पण तसे काही होत नाही,

आजपर्यंत सुखावह असे तुला मी काहीच दिले नाही,

तरी सुद्धा तुझ्या ओठावरचे हासु ओसंडून वाही.

 

हेवेदावे होता कधी तुझ्या माझ्यामध्ये डोळ्यातून तुझ्या पाणी रिप रिप वाही,

समजावल्यावर क्षणार्धात बदलाने चेहऱ्यावर तुझ्या पूर्वीसारखेच हासु येई,

धन्यवाद कसा देऊ तुला शब्द तोडकेच होई,

आजपर्यंत सुखावह असे तुला मी काहीच दिले नाही,

तरी सुद्धा तुझ्या ओठावरचे हासु ओसंडून वाही.

 

तुला द्यायचे जरी सर्व सुखसोई छोट्या गोष्टी कित्ती त्याने दुरावल्या जाई,

नको चांदण्यांचे गाव आणि नऊवारी साज तुला आवडते साधी भेळ पाणीपुरी,

झाहली चूक पाहिली पुन्हा पुनरावृत्ती नाही,

आजपर्यंत सुखावह असे तुला मी काहीच दिले नाही,

तरी सुद्धा तुझ्या ओठावरचे हासु ओसंडून वाही.

 

 

 

 

 

 

कवी.... प्रसाद वाचकवडे

कट्यार........

खुप दिवसांनी कवितेचा दुष्काळ संपला...... कट्यार........ भारलेली ती सकाळ , दवबिंदु शिंपीत होती , लाजुनी हसणे तुझे ते , त्यावर...